Share

“अजित पवार हुशार राजकारणी असून वेळ बरोबर मारून नेतात”, चंद्रकांत पाटलांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी निधी वाटपावरुन उप मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार हे हुशार राजकारणी असून वेळ बरोबर मारून नेतात असा टोला चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत लगावला आहे.

“काँग्रेसचे २५ ते २६ आमदार नाराज आहेत. शिवसेनेच्या इतर अनेक आमदारांनी आपली नाराजी उघडपणे मांडत अर्थसंकल्पीय सत्रात बसणार नाही असे निवेदन उध्दव ठाकरे यांना दिले. त्यामुळे या आमदारांची समजूत काढण्यासाठी २ हजार कोटींचा निधी देण्यात आला. असा निधी देता येत नाही. परंतु, अजित पवार हे अतिशय हुशार राजकारणी असून वेळ बरोबर मारून नेतात.”, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

तसेच यावेळी त्यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला. करुणा शर्मा यांनी ज्यावेळी परळीमध्ये जाऊन न्याय मागण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यांच्या गाडीच्या डिकीत रिव्हाॅल्वर ठेऊन त्यांना १५ दिवस तुरूंगात टाकलं. न्यायासाठी करूणा शर्मा यांनी अक्षरशः आक्रोश करूनही त्यांना न्याय मिळाला नाही. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटास करमुक्त करणार नाहीत ते सर्व मुख्यमंत्री देशाचे दुश्मन; संजय राऊतांचा भाजपला टोला

‘त्या’ हिंसेवर पाणी टाकण्याऐवजी तेल ओतण्याचे काम भाजपवाले करतायेत; संजय राऊतांचा आरोप

“… तरच भाजपविरोधी आघाडीस बळ मिळेल व ‘यूपीए’चा जीर्णोद्धार शक्य होईल”,- संजय राऊत

IPL 2022: ”तो यंदा ६०० पेक्षा जास्त धावा करेल”, एबी डिव्हिलियर्सची विराटबाबत मोठी भविष्यवाणी!

IPL 2022 RCB vs KKR : कोलकाताची झुंज अपयशी; बंगळुरूचा हंगामातील पहिला विजय!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!