Share

“…असल्या भेकड धमक्यांना भाजप भीक घालत नाही”, ‘त्या’ घटनेवरून भातखळकरांचा राष्ट्रवादीला इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून गुंड प्रवृत्ती असलेल्या लोकांना पुढे करून आम्हाला धमकावले जात असल्याची तक्रार भाजप नेते सचिन पोटरे (Sachin Potre) यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (rohit pawar) यांच्या चुकीच्या धोरणांवर टीका केल्याने कार्यकर्त्यांकडून धमक्या दिल्या जात असल्याचे पोटरे यांनी म्हटले आहे. याबाबतीत भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दिली आहे. यावरच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar ) यांनी ट्वीट करत राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.

“रोहित पवार यांच्या चुकीच्या धोरणांवर टीका केली म्हणून अहमदनगर मधील कर्जत तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून धमक्या दिल्या जात आहेत. असल्या भेकड धमक्यांना भाजप भीक घालत नाही. जनता तुमचा सत्तेचा माज उतरवल्या शिवाय रहाणार नाही.”, असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

दरम्यान पोटरे यांनी म्हटले की, “माजी मंत्री शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात मंजूर केलेल्या व सध्या अपूर्ण असलेल्या विकासकामांबद्दल पक्षाच्या वतीने मिडीया, व विविध वृत्तपत्रात भाजपची भूमिका मांडत असतो. यामुळे धांडेवाडी येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे हे गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना पुढे घालून सातत्याने मोबाईलवर धमकी देतात.” दरम्यान धमकी देणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरूध्द गुन्हा दाखल व्हावा, १५ दिवसांच्या आत तडीपारीचा प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. अन्यथा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा भाजपने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

अजित पवार हुशार राजकारणी असून वेळ बरोबर मारून नेतात”, चंद्रकांत पाटलांचा टोला

‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटास करमुक्त करणार नाहीत ते सर्व मुख्यमंत्री देशाचे दुश्मन; संजय राऊतांचा भाजपला टोला

‘त्या’ हिंसेवर पाणी टाकण्याऐवजी तेल ओतण्याचे काम भाजपवाले करतायेत; संजय राऊतांचा आरोप

“… तरच भाजपविरोधी आघाडीस बळ मिळेल व ‘यूपीए’चा जीर्णोद्धार शक्य होईल”,- संजय राऊत

IPL 2022: ”तो यंदा ६०० पेक्षा जास्त धावा करेल”, एबी डिव्हिलियर्सची विराटबाबत मोठी भविष्यवाणी!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!