Share

अफगाणिस्तानातील नव्या सत्तेबाबत भारत ‘वेट अँड वॉच’ च्या भूमिकेत

Published On: 

नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील समस्यांसंदर्भात आज एक महत्त्वाची सर्वपक्षीय बैठक दिल्लीत पार पडली. तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील स्थिती बिकट झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांना विश्वासात घेण्याचा हा सरकारकडून केलेला पहिलाच प्रयत्न होता.

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी कब्जा केला. या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका नेमकी काय असणार? सरकार तालिबान्यांसोबत चर्चा करणार की नाही? भविष्यात अफगाणिस्तानसोबत नेमके कसे संबंध असणार? आदी प्रश्नसंदर्भातच आज केंद्र सरकारने ही महत्वाची सर्वपक्षीय बैठक बोलावली आणि सद्यस्थितीची माहिती देशातल्या सर्व प्रमुख नेत्यांना दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेतल्या गटनेत्यांसाठी ही बैठक ठेवली होती. बैठकीला देशातले जवळपास ३४ पेक्षा अधिक पक्षांचे नेते उपस्थित होते. सरकारने या प्रश्नावर विरोधकांना विश्वासात घेण्याचा हा प्रयत्न होता. महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेनेचे गजानन कीर्तीकर या बैठकीला हजर होते. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत या बैठकीत चर्चा झाली.

दरम्यान, सर्व देशांप्रमाणे भारतानेही तालिबान्यांच्या नव्या सत्तेबाबत वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका ही भारत सरकारची सध्याची प्राथमिकता आहे. त्याबाबत सविस्तर माहिती सर्वपक्षीयांना देण्यात आली. तसेच अफगाणमधल्या स्थितीनंतर देशात दहशतवादाचा धोका वाढू शकतो का याबद्दलही प्रश्न विचारले गेले, त्यावर सरकारने त्यादृष्टीने सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्याचे सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!