ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला आज (गुरूवार) पासून सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतू पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल या सलामीवीरांनी पहिल्याच सामन्यात निराशा केली ऍडलेडच्या मैदानात होणारी ही टेस्ट मॅच डे-नाईट असल्यामुळे गुलाबी बॉलने खेळवण्यात येणार आहे.
कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दाखल झालेला रोहित शर्माही दुसऱ्या कसोटी सामन्यापर्यंत खेळू शकणार नाहीये. त्यामुळे अशा परिस्थितीत भारतीय संघासमोर मोठं आव्हान असणार आहे. परंतू माजी खेळाडू सचिन तेंडुलकरच्या मते भारताकडे कोहली-रोहितशिवाय सामना जिंकवून देतील असे फलंदाज आहेत. “दोन्ही फलंदाजांच्या अनुपस्थितीत धावा करतील असे फलंदाज भारताकडे आहेत. भारतीय संघात फलंदाजीसाठी खूप चांगले पर्याय आहेत. न्यूझीलंडमध्येही रोहित शर्मा भारतीय संघात नव्हता. रोहितशिवाय एखादा दौरा खेळण्याची ही आपली पहिलीच वेळ नाहीये. क्रिकेटमध्ये काहीच शाश्वत नसतं. कधीकधी खेळाडू दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेला मुकतात. त्यामुळे संघाला एखाद्या खेळाडूशिवाय मैदानात उतरण्याची तयारी करावी लागते.” सचिन Reuters ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.
पहिली टेस्ट मॅच संपल्यानंतर विराट कोहलीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली ‘पॅटरनिटी’ लीव्हवर जाणार आहे. विराटच्या गैरहजेरीमध्ये अजिंक्य रहाणे उरलेल्या तीन मॅचमध्ये भारताचं नेतृत्व करेल.
महत्वाच्या बातम्या
- विद्यार्थ्यांसाठी खुशखबर : एक-दोन नव्हे तब्बल चार वेळा होणार JEE Main परीक्षा
- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार साडेतीन हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य
- अतिवृष्टीच्या संकटातून सावरण्यासाठी राज्यात शेतकऱ्यांना दिवसा विज पुरवठा करा : भाजपा
- पहिल्या टेस्ट मॅचमध्ये पृथ्वी शॉ पुन्हा अपयशी, एकही रन न घेता माघारी
- अन्वय नाईक प्रकरण : आरोपपत्राला आव्हान देण्यास अर्णब गोस्वामींना हायकोर्टाची परवानगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

