Share

“तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा”, गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण आणि पदोन्नती आरक्षण यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद ( Sharad Pawar) पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीटरवर एक फोटो पोस्ट करत टीका केली आहे.

“तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा…मेरा साया साथ होगा” असे कॅप्शन देत गोपीचंद पडळकर यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. ओबीसीचे राजकीय आरक्षण गेले, मराठा समाजाचे तर सगळेच आरक्षण रद्द झाले. यावरूनच गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

ओबीसींचे राजकीय आरक्षण जाण्यास महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसी मंत्रीच जबाबदार असल्याची टीका यापूर्वी भाजपने केली होती. मात्र यावर अजूनही कोणताही फेरविचार किंवा प्रयत्न झाला नसल्याने आता गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा हे मुद्दे समोर आणले आहेत. ओबीसी आणि मराठा आरक्षणासोबतच पदोन्नती आरक्षणही रद्द करण्यात आले, यावरही कोणताही ठोस पर्याय महाविकास आघाडी सरकारने शोधलेला नाही, त्यामुळे भाजपने आता पुन्हा एकदा मराठा ,ओबीसी आणि पदोन्नती आरक्षणाचा मुद्दा समोर आणत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!