Share

“एक अभिनेता म्हणुन त्यांनी नथुराम ची भुमिका पार पाडली, याचा अर्थ त्याचे समर्थन केले असे नाही”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन आता नवा वाद रंगला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने वाद निर्माण झाला आहे. नथुराम गोडसे यांची भूमिका साकारल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. मात्र राष्ट्रवादी पक्षाचे अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मात्र अमोल कोल्हेंची बाजू घेतली आहे.

“खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आव्हानात्मक भुमिका साकारली. एक अभिनेता म्हणुन त्यांनी नथुराम ची भुमिका पार पाडली असेल याचा अर्थ त्याचे समर्थन केले असे नाही. रामायणात त्रिवेदी यांनी रावणाची साकारलेली भुमिका आठवा प्रत्यक्षात मात्र ते रामभक्त होते हे वास्तव आहे.” असे ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले आहे.

दरम्यान अमोल कोल्हे यांच्या Why I Killed Gandhi चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट ३० जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्यांच्या भूमिकेवरून जितेंद्र आव्हाड म्हणाले, विनय आपटे, शरद पोंक्षे ह्यांना ह्या भूमिके बद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेनी प्रचंड विरोध केली त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून ह्या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार.डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही, असं आव्हाड म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!