मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा एकमेव कसोटी सामना ब्रिस्टल येथे सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात ३९६ धावांवर डाव घोषीत केला होता. प्रत्युत्तरात भारतीय महिला संघ २३१ धावा करुन सर्वबाद झाला. यानंतर इंग्लंडच्या संघाने भारतीय संघाला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने दुसऱ्या डावात १ गडी गमावत ८३ धावांची मजल मारली आहे. भारतीय संघ अजुनही ८२ धावांनी पिछाडीवर आहे.
इंग्लंड दौऱ्यातील भारतीय महिला संघाचा एकमेव कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय महिला संघाने पहिल्या डावात २३१ धावांची मजल मारली. या डावात भारतीय महिला संघाची सलामीवीर शेफाली वर्माने पदार्पणातच जबरदस्त खेळी करत शानदार अर्धशतक झळकावले. १५२ चेंडुचा सामना करताना शेफालीने ९६ धावांची खेळी केली. तिचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले. याखेळी दरम्यान तिने १३ चौकार आणि २ षटकार लगावले.
स्म्रिती मंधानाने तिला चांगली साथ देत शानदार ७८ धावांची खेळी साकारली. भाराताच्या दोन्ही सलामीवीरांनी १६७ धावांची धमाकेदार सलामी देत सामन्यावर पकड बनवली होती. मात्र दोन्ही सलामीवीर बाद होताच १६७ वर १ बाद वरुन संपुर्ण भारतीय संघ २३१ वर बाद झाला. यासह इंग्लंडच्या संघाला पहिल्या डावात १६५ धावांची आघाडी मिळाली. यानंतर इंग्लंडने भारतीय संघाला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दुसऱ्या डावात भारताने १ गडी गमावत ८३ धावांची मजल मारली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘ढग साफ झाले आहेत’ ; फोटो शेअर करत मुंबई इंडियन्सने क्रिकेट प्रेमींना दिला दिलासा
- “स्वबळाची भाषा राष्ट्रवादी करत नाही”, टोंपेंचे ‘स्वबळावर’ स्पष्टीकरण
- पडद्यावरील ‘मिल्खा सिंग’ फरहानने वाहिली श्रद्धांजली ; म्हणाला, विश्वास बसत नाहीये…
- मिल्खा सिंग यांचा वारसा सदैव सोबत राहील; अनिल कुंबळेंच्या भावना
- पहिल्या दिवशी वरुणदेवाने बॅटिंग केल्यामुळे खेळ वाया; दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
