मुंबई : आयसीसी आयोजीत जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना दोन दिवसावर येउन ठेपला आहे. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना मंगळवारी १५ जुन रोजी दुपारी न्युझीलंडने या सामन्यासाठी संघाची घोषणा केली. यानंतर काही वेळातच बीसीसीआयने देखील या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली.
या सामन्यासाठी घोषणा केलेल्या १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यादरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटु व्ही. व्ही. एस लक्ष्मण ने डब्ल्युटीसी अंतिम सामन्यासाठी आर अश्विन आणि अष्टपैलु रविंद्र जडेजा यांचा अंतिम एकादशमध्ये समावेश व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना लक्ष्मण म्हणाले की,’डब्ल्युटीसी फायनलमध्ये मी या दोन्ही फिरकीपटुंना एकत्र पाहु इच्छितो. जडेजा सध्या त्याच्या सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. दबावाच्या क्षणी त्याची फलंदाजी चांगलीच निखरते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अंजिक्य रहाणे सोबत त्याची भागीदारी याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. तो डावखुरा फलंदाज असल्यामुळे त्याचाही फायदा भारतीय संघाला होईल. तसेही मागील काही काळात त्याने गोलंदाजीतही खुप सुधारणा केल्या आहेत.’
पुढे बोलताना लक्ष्मणने अश्विचने कौतुक केले आणि म्हणाला की,’आर अश्विन हा जगातील एक सर्वोत्कृष्ट ऑफ स्पिनर आहे. कसोटी क्रिकेटमधील तो एक महान खेळाडू आहे.ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने फलंदाजांच्या धावांचा प्रवाह ज्या प्रकारे रोखला होता ते कौतुकास्पद होते. तसेच मोक्याच्या क्षणी दबावात असताना त्याने फलंदाजीतही चांगली कामगीरी करत भारताला विजय मिळवुन दिला आहे.’ येत्या १८ जुन रोजी जेव्हा भारतीय संघाच्या अंतिम ११ खेळाडुंचे नाव समोर येईल तेव्हा स्पष्ट होईल की लक्ष्मणची इच्छा पुर्ण होते की नाही.
महत्वाच्या बातम्या
- कसोटी महाभारत! अंतिम लढतीसाठी भारतीय संघाची घोषणा
- तिसऱ्या लाटेसाठी औरंगाबाद मनपाला हवेत ७७ कोटी ७३ लाख रुपये, राज्यशासनाकडे पाठवला प्रस्ताव!
- बीडमध्ये रेशन दुकानदारकडून लाच घेतना पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
- सुखद! मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या घरातील तीन जणांची एसटीत नियुक्ती
- पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात औरंगाबादेत बहुजन मुक्ती पार्टीचे ‘वाहनांना धक्का’ मारो आंदोलन!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
