मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महागाईच्या दबावाखाली तब्बल दोन वर्षांनी रेपो दरात वाढ केली असून याशिवाय RBI ने कॅश रिझर्व्ह रेशो (CRR) मध्ये 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. तसेच CRR आता 4.50 टक्क्यांवर आला आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाष्य केले आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्याने गृहकर्ज , वाहनकर्जाचे हप्ते तर वाढलेच, पण त्याबरोबरच गृहनिर्माण क्षेत्र आणि शेअर बाजारालाही याचा जबर फटका बसला आहे. देशातील मध्यमवर्गीय व सर्वसामान्य जनता महागाईच्या भडक्यामुळे जर्जर झालेली असतानाच कर्जांचे हप्ते वाढवणारा हा निर्णय सामान्य माणसाला आगीतून फुफाट्यात टाकणारा आहे. महागाईचा राक्षस दिवसेंदिवस आपली मिठी घट्ट करतो आहे आणि त्याला मस्तवाल करणाऱ्यानाच जनतेने सत्तेवर आणले आहे. अशा वेळी दाद कुठे मागायची, हाही प्रश्नच आहे’, असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘महागाईच्या आगीत होरपळत असलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्रीय सरकार काही ठोस उपाययोजना जाहीर करेल असे वाटत असतानाच या आगीत आणखी तेल ओतणारे पाऊल देशाच्या मध्यवर्ती बँकेने उचलले आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी ‘मॉनेटरी पॉलिसी कमिटी’ची तातडीची बैठक घेतली आणि त्यापाठोपाठ तडकाफडकी पत्रकार परिषद घेऊन रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटमध्ये 0.40 टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा केली. त्यामुळे रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट 4 टक्क्यांवरून आता 4.40 टक्क्यांवर गेला आहे. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या निर्णयामुळे बाजारातील मागणी घटेल आणि रेपो रेट कमी केल्यामुळे महागाईच्या दराचा आलेख ओसरू लागेल असा चमत्कारिक युक्तिवाद काही अर्थशास्त्री आता करत आहेत. या दाव्यात किती दम आहे हे येत्या दोन-तीन महिन्यांत दिसेलच.’
महत्वाच्या बातम्या:
- राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ; दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी
- राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या भाजप खासदाराला मनसेचे प्रत्युत्तर!
- “फुले, शाहुंचे विचार आंबेडकरांनी पुस्तकात बंद केले”- जितेंद्र आव्हाड
- “भोंग्याच्या मुद्द्यावर राज ठाकरेंना जनतेचा ठेंगा मिळाला” – गुलाबराव पाटील
- “हनुमान चालीसा म्हणणे हा राजद्रोह कसा होऊ शकतो”- सुधीर मुनगंटीवार


