मुंबई : स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा आवाज कायमचाच हरपला असून काल(६ फेब्रु.) रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी (Lata Mangeshkar dies at 92) त्यांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या स्वरांनी संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर यांचं मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांसह अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. सिनेसृष्टी तसेच संगीत क्षेत्रातील मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पायातील बूट काढले. श्रद्धांजली वाहिल्यानंतर जेव्हा शरद पवार हे बूट घालण्यासाठी आले तेव्हा स्वतः सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी आपल्या वडिलांच्या पायात बूट घातले. बाप लेकीच्या या आपुलकीच्या नात्याने यावेळी सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
दरम्यान, प्रभूकुंज निवासस्थानावर दुपारी १२.३० ते ३ वाजेपर्यंत लतादीदींचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर लतादीदींचं पार्थिव दादर शिवाजी पार्कमध्ये आणलं गेलं. त्यापूर्वी पोलिसांनी लतादीदींना मानवंदना दिली. दुपारी तीन वाजता लतादीदींची अंत्ययात्रा निघाली होती. यावेळी लतादीदींचं अंतिम दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गर्दी जमली होती.
महत्वाच्या बातम्या:
‘मी तुमच्या सोबत गाणार नाही…’; शांत स्वभावाच्या लतादीदी जेव्हा मोहम्मद रफींवर भडकल्या
लता मंगेशकरांची अंत्ययात्रा शिवाजी पार्ककडे रवाना; लाखोंची गर्दी होण्याची शक्यता
लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; राज्यात सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर
‘तुझी हिम्मत कशी झाली…’; जेव्हा लतादीदींसाठी बाळासाहेबांनी गुलशन कुमार यांना झापलं होतं
पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू पण लता मंगेशकर यांच्या निधनाने व्यथित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

