🕒 1 min read
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे. पुणे महापालिकेमध्ये जात असताना सोमय्यांना शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली. या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यावरून ही धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप पुणे भाजप शहराध्यक्षांनी केला होता. तर किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून ही गुंडगिरी केली असल्याचे म्हटले होते. यावरच संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) पत्रकार परिषद घेणार होते.
दरम्यान संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांच्या आरोपांना जवाब देणार होते. पण “गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने राष्ट्रीय दुखवटा सुरू आहे. आपण सगळेच शोकमग्न आहोत. मी ऊद्या (सोमवारी) शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार होतो. तूर्त ती रद्द करण्यात आली आहे. लवकरच मी रोखठोक बोलेन”, असे ट्वीट करत राऊत यांनी पत्रकार परिषद रद्द केल्याची माहिती दिली आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने राष्ट्रीय दुखवटा सुरू आहे. आपण सगळेच शोकमग्न आहोत. मी ऊद्या (सोमवारी) शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार होतो. तूर्त ती रद्द करण्यात आली आहे. लवकरच मी रोखठोक बोलेन@CMOMaharashtra @PawarSpeaks @Dev_Fadnavis
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 6, 2022
दरम्यान सुजित पाटकर (Sujit Patkar), संजय राऊत आणि ऑर्डर देणाऱ्या उद्धव ठाकरेंवर हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. धक्काबुक्की दरम्यान सोमय्या यांना दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “लता मंगेशकर यांच्या निधनाने गंगा-यमुनेचा प्रवाह थांबला, हिमालयही दुःखाने वितळून गेला”
- बापलेकीचं आपुलकीचं नातं… सुप्रिया सुळेंनी स्वतःच्या हाताने घातले शरद पवारांच्या पायात बूट
- पाकिस्तानच्या पंतप्रधानांची लता मंगेशकर यांना श्रद्धांजली
- विराट कोहलीने रचला नवीन इतिहास ..
- गडकिल्ले फिरत असताना अजून एका ट्रेकरचा मृत्यू..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
