Share

सहा महिन्यानच्या बंदीनंतर आज पहिल्यांदाच उतरणार ‘हा’ खेळाडू मैदानात

Published On: 

नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंकायांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना शुक्रवारपासून (४ मार्च) मोहाली येथे आयएस बिंद्रा स्टेडीयमवर खेळला जाणार आहे. या अगोदर या दोन्ही संघात ३ सामन्यांची टी२० मालिका खेळली गेली होती.  जी भारताने ३-० च्या फरकाने जिंकली.

या टी२० मालिकेत श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज कुसल मेंडिस फिटनसल्यामुळे खेळला नव्हता. आता कसोटी मालिकेतूनही मेंडिसने माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी श्रीलंकन कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने मेंडिस खेळू शकणार नसल्याची माहिती दिली आहे.

मागील सहा महिन्यांपूर्वी ज्या खेळाडूवर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने बंदी घातली होती. त्या निरोशन डिकवेला याला मेंडीसच्या जागी भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात यष्टीरक्षक म्हणून श्रीलंकन संघात संधी मिळाली आहे. यामध्ये योगायोग ही असा आहे की, ज्या कुसल मेंडीसच्या जागी निरोशन खेळत आहे. त्या मेंडीसवरही श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने बंदी घातली होती. त्याच्याव्यतिरिक्त दामुश्का गुनातिलकावरही बोर्डाने बंदी घातली होती.

याचे कारण असे की, या तिघांनी मागील वर्षी इंग्लंड दौऱ्यात बायो बबलचे उल्लंघन केले होते. याच कारणास्तव बोर्डाने यांच्यावर एक वर्षाची बंदी घातली होती. परंतु ही बंदी सहा महिन्याच्या आत हटवण्यात आली. जानेवारी महिन्यात बंदी हटवल्यानंतर गुनातिलका आणि मेंडीस यांनी मैदानात पुरागमन केले होते. पण निरोशनला आता पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!