🕒 1 min read
मुंबई: टी-२० मालिकेत श्रीलंकेवर क्लीन स्वीप केल्यानंतर टीम इंडिया लंकाविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी उत्सुक आहे. मोहाली येथील पीसीए आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा फैसला केला आहे.
भारताचा श्रीलंकेविरुद्ध पहिला कसोटी सामना विराटचा (virat kohli) १००वा कसोटी सामना आहे. ज्यामुळे सामना सुरु होण्याआधी कोच राहुल द्रविड (rahul dravid) यांच्या हस्ते विराट कोहलीला सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा (anushka sharma) सुद्धा यावेळी त्याच्यासोबत मैदानावर उपस्थित होती. या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहलीकडे असतील, जो आपली १०० वी कसोटी खेळणार आहे. या खास प्रसंगी कोहली मोठ्या धावा करण्यास उत्सुक असेल. भारतीय संघाचा मोहालीच्या मैदानावर रेकॉर्ड अबाधित आहे. भारताने १९९४ पासून आजपर्यंत मोहालीच्या मैदानावर एकही कसोटी सामना गमावलेला नाही.
पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघ भारत: आर शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह
श्रीलंका: दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, पथुम निसांका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चारिथ असलंका, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), सुरंगा लकमल, लसिथ एम्बुल्डेनिया, विश्व फर्नांडो, लाहिरू कुमारा
महत्वाच्या बातम्या
- IND vs SL: रोहित शर्माने सांगितले विराटने केलेले त्याच्या आवडीचे कसोटी शतक
- SWAG! केंद्रीय मंत्री दानवे आणि कपिल पाटलांची क्रिकेटच्या मैदानावरही तुफान फटकेबाजी
- IND vs SL: विराटच्या १००वा कसोटी सामना पाहण्यासाठी स्टेडियम झाले हाऊसफुल!
- Operation Ganga: २१९ विद्यार्थी युक्रेनहून दिल्लीत दाखल
- IND vs SL: भारताचा श्रीलंका विरुद्ध पहिला कसोटी सामना आजपासून रंगणार ; विराट कोहलीसाठी ऐतिहासिक दिवस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
