Share

CISF च्या ५३व्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची हजेरी.

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : CISF म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल. आज केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा ५३ वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारमधील गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. गाझियाबाद येथील CISF च्या अकादमीमध्ये CISF चा ५३ वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला, यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी CISF च्या कामाचे भरभरून कौतुक केले.

CISF च्या ५३ व्या स्थापना दिवसाला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांना उद्देशून अमित शाह म्हणाले कि, ‘ गेल्या दोन वर्षांपासून आपल्याला ज्या कोविड महामारीने त्रास दिला आहे; त्या कोविड महामारीचा सामना करताना CISF च्या अधिकाऱ्यांनी आणि जवानांनी आपल्या जीवाची पर्वा न करता भारतीय लोकांची सेवा केली आहे. तसेच युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी सुरु केलेल्या ऑपरेशन गंगामध्ये देखील CISF महत्वाची भूमिका बजावत आहे’.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल हे केंद्रीय गृहमंत्रांलयाच्या अख्यारीत काम करते. भारतातील ६ प्रमुख केंद्रीय सुरक्षा दलांपैकी एक म्हणजे CISF होय. भारतातील विविध औद्यगिक संस्थापनांची सुरक्षा बघणे हे CISF चे प्रमुख काम होय.

महत्वाच्या बातम्या :     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!