Share

IND vs SL : प्रतिष्ठा , परंपरा , अनुशासन! कर्णधार रोहितने ट्रॉफी सोपवली तरुणांच्या हाती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने दोन्ही सामने प्रभावी शैलीत जिंकून श्रीलंकेविरुद्ध आरामात कसोटी मालिका जिंकली आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना पंजाब क्रिकेट असोसिएशन IS बिंद्रा स्टेडियम, मोहाली, चंदीगड येथे झाला आणि भारताने हा सामना एक डाव आणि २२२ धावांनी जिंकला. तर दुसरा सामना, जो गुलाबी-बॉलचा कसोटी सामना होता, एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे झाला आणि भारताने २३८धावांनी जिंकून १२ महत्त्वपूर्ण ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) गुण मिळवले आहेत.

दरम्यान, श्रीलंकेला क्लीन स्वीप करत कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने (rohit sharma) परंपरा कायम ठेवत युवा खेळाडूंना ट्रॉफी सुपूर्द केली. हे दोन खेळाडू कोण असा सवाल अनेक क्रिकेट रसिकांना पडला. हे दोन खेळाडू प्रियांक पांचाळ (priyank panchal) आणि सौरभ कुमार (saurabh kumar) होते. ज्यांना या मालिकेत खेळायची संधी मिळाली नाही मात्र भारतीय कर्णधाराने ट्रॉफी त्यांना प्रदान केली.

https://twitter.com/addicric/status/1503356227517964288?s=20&t=gr0buMOrBqAsg5Devt9Iyw

रोहित शर्माचा तरुणांना ट्रॉफी सुपूर्द करतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोबतच घरच्या मैदानावर भारताचा हा सलग १५ वा कसोटी मालिका विजय ठरला आहे. यासह टीम इंडियाने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला. क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही संघाने घरच्या मैदानावर इतक्या सलग कसोटी मालिका जिंकलेल्या नाहीत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!