Share

“हिंमत असेल तर हे प्रकरण CBI ला सोपवून दाखवा”, चंद्रकांत पाटलांचे आव्हान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधानसभा अध्यक्ष्यांना राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असलेला पेनड्राईव्ह दिला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळाले. तद्पश्चात फडणवीसांना पोलिसांनी नोटीस पाठवली. तसेच याप्रकरणी १३ मार्च रोजी मुंबईच्या सायबर पोलिसांनी फडणवीसांचा दोन तास जबाब नोंदवला. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच हिंमत असेल तर हे प्रकरण CBI ला सोपवून दाखवा, असे आव्हानही पाटलांनी केले आहे.

यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘देवेंद्र फडणवीसांच्या पेनड्राईव्ह दणक्यानंतर सरकार पुरतं हादरलं आहे. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनीही भीतीपोटी आपला राजीनामा सोपवला. पण हे प्रकरण CID ला देऊन ‘आपलीच बॅट आणि आपलाच बॉल’ असा फड मविआने मांडला आहे.’

दरम्यान, CID कोणाच्या इशाऱ्यावर काम करते, हे नव्याने सांगण्याची गरज नाही आणि जनतेलाही ते दिसत आहे.किंचितभर तरी हिंमत असेल तर हे प्रकरण CBI ला सोपवून दाखवा मग तुम्हालाच तुमचा खरा चेहरा दिसेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!