मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत नवा पेनड्राईव्ह बॉम्ब सादर केला. यामध्ये एक ऑडिओ आहे, अशी सभागृहाला त्यांनी माहिती दिली. डॉ. मुद्दस्सिर लांबे यांचा संबंध दाऊदशी असून डॉ. मुद्दस्सिर लांबे आणि अर्शद खान यांच्यातील संभाषणाचा हा ऑडिओ आहे असे सांगितले. डॉ लांबे यांना राज्य सरकारने वक्फ बोर्ड वरती घेतले आहे. तसेच एका सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेने त्यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार केली आहे, असेही फडणवीस आज विधानसभेत म्हणाले.
फडणवीसांनी सांगितलेलं अर्धसत्य हे पूर्ण खोटं आहे – सना मलिक शेख
फडणवीसांच्या या दाव्याचं खंडण करत मंत्री नबाव मलिक यांच्या कन्या सना मलिक शेख यांनी ‘डॉ. मुद्दस्सिर लांबे यांची वक्फ बोर्डावर नियुक्ती मलिकांच्या काळात झाली’ हा मुद्दा खोडून काढला. सना मलिक शेख यांनी डॉ. मुद्दस्सिर लांबे यांच्यासह फडणवीसांचा फोटो ट्वीट केला आहे. व म्हणाल्या की, फडणवीसांनी सांगितलेलं अर्धसत्य हे पूर्ण खोटं आहे. डॉ. लांबे यांची 13 सप्टेंबर 2019 रोजी फडणवीस सरकारने वक्फ बोर्ड सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. महाविकास आघाडी सरकारची स्थापना नोव्हेंबर 2019 मध्ये झाली. माझ्या वडिलांना जानेवारी 2020 च्या पहिल्या आठवड्यात अल्पसंख्याक विभाग मिळाला.
आज दाऊदशी संबधित फडणवीसांनी एक संवादाचा पेनड्राईव्ह विधानसभेत सादर केला आणि तो संवाद देखील उपस्थिती सर्वांना वाचून देखील दाखवला. फडणवीस म्हणाले, या पेनड्राईव्हमधील संभाषणात दोन व्यक्ती आहेत. त्यापैकी एक आहे मोहम्मद अर्शद खान आणि दुसरा म्हणजे ज्यांना अल्पसंख्याक मंत्र्यांनी वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून घेतलं आहे असे डॉ. मुद्दसीर लांबे. तसेच यासह 31 डिसेंबर 2020 रोजी डॉ.लांबे यांच्याविरोधात एका सामाजिक कार्यकर्तीने बलात्काराची तक्रार दाखल केली होती, असेही फडणवीसांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या –


