Share

IND vs SL : भारतीय संघाने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत रचले अनेक विक्रम

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारतीय संघाने टी २० मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेला ६२ धावांच्या मोठ्या अंतराने पराभूत केले आहे.तसेच भारताने ३ सामन्यांच्या या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. सोबतच श्रीलंकेला परास्त करताना भारतीय खेळाडूंनी काही नवे विक्रम आपल्या नावे केले आहेत.

सर्वात आधी भारतीय संघासाठी हा सलग १० वा विजय ठरला आहे. भारतीय संघ न्यूझीलँड दौऱ्यापासून विजयी राहिला आहे. कर्णधार रोहित शर्मा जागतिक क्रिकेट मध्ये टी २० फॉरमॅटचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याच्याआधी मार्टिन गप्टिलच्या नावावर हा विक्रम होता. तसेच ईशान किशन सोबत सलामीला त्याने केलेली १११ धावांची भागीदारी टी २० मध्ये कोणत्याही भारतीय सलामीवीरांनी याआधी केली नव्हती. त्यांची ही भागीदारी सर्वोच्च ठरली आहे.

भारतीय गोलंदाजांनीही विक्रम केले आहे. भुवनेश्वर कुमारसाठी श्रीलंका विरुद्धचा पहिला सामना त्याच्या कारकिर्दतील सर्व फॉरमॅट मिळून २००वा सामना ठरला आहे. तर फिरकीपटू युझवेंद्र चहल टी २० फॉरमॅट मध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने ५३ सामन्यात ६७ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!