Share

पुण्यातील नदी सुधार योजनेला ठाकरे सरकारकडून ब्रेक!

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली नदीसुधार योजना राज्य सरकारने थांबवली आहे. तब्बल 7 हजार कोटींचा हा नदीसुधार योजनेचा प्रकल्प रेंगाळणार आहे, असे दिसत आहे. पुररेषेत झालेला बदल आणि पर्यावरण वाद्यांचे आक्षेप पाहून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. या योजनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  केले होते.

पुण्यातील नदी सुधार योजनेला ठाकरे सरकारने ब्रेक लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यातच या प्रकल्पाचं भूमिपूजन केले होते. या योजने संदर्भात ठाकरे सरकारनं आक्षेप, योजनेतील कामे, परिणाम या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नगरविकास, जलसंपदा आणि पर्यावरण खात्यातील सचिवांची समिती नेमण्यात येणार आहे. ही समिती नदी सुधार योजना प्रकल्पाबद्दल पुढील आठ ते दहा दिवसात अहवाल देणार असल्याचे देखील सांगितले आहे.

पुण्यातील नदी सुधार योजनेचा अभ्यास करणाऱ्या समितीनं अहवाल सादर केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा होणार आहे, अशी माहिती आहे. दोन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर या प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!