Share

IND vs SA 2022 : दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ फलंदाजाने मानले आयपीएलचे आभार; म्हणाला…!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात २११ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात डेव्हिड मिलर आणि वान डर डूसेन यांच्या शानदार खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने १९.१ षटकात ३ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह दक्षिण आफ्रिका संघाने मलिकेत भारतावर १-० अशी आघाडी घेतली आहे.

सामन्यानंतर डुसेन म्हणाला, “आयपीएलमध्ये खेळल्याची मला निश्चितच खूप मदत झाली. मी आयपीएलचे बरेच सामने पाहिले आहेत, असे नाही की मला अनेक सामने खेळण्याची संधी मिळाली आहे, परंतु भारतात गोलंदाज कोणत्या परिस्थितीत गोलंदाजी करतात याबद्दल खूप काही पाहिले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत भारतातील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. मी येथे दोन महिने या परिस्थितीत घालवले, इथे उष्णतेमध्ये राहिलो, त्यामुळेच इथे खेळण्याची मला सवय झाली आहे आणि हेच संघातील इतर सहकाऱ्यांनाही लागू होते.”

मिलर आणि वान डर डूसेन यांनी भारताविरुद्ध १३१ धावांची भागीदारी करून सामन्याचे चित्र पालटले. दोघांनी भारताविरुद्ध झंझावाती खेळी खेळली आणि अर्धशतकं झळकावून दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला. डूसेन ४६ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ७५ धावा केल्या, तर मिलरने ३१ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ६४ धावा केल्या.

डूसेन म्हणाला की, “मी सामन्यामध्ये सुरुवातीला दडपणाखाली खेळत खेळपट्टीचा अंदाज घेण्यासाठी धडपडत होतो पण डेव्हिडने आयपीएलचा फॉर्म सुरू ठेवला आणि शानदार खेळी खेळली. त्याने गोलंदाजांवर दबाव टाकला. त्यामुळे मलाही दडपणाखालून बाहेर निघून मनसोक्त खेळी करता आली.”

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कटक येथील बाराबती स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सध्या मालिकेत दक्षिण आफ्रिका १-० ने आघाडीवर आहे. त्यामुळे दुसर्‍या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. आयपीएलमधील पंजाबचा वेगवान युवा गोलंदाज अर्शदीप सिंगला दुसऱ्या सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकते. दिल्लीची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करणारी होती. मात्र भारताच्या कोणत्याही फिरकीपटूला चांगली कामगिरी करता आली नाही.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!