🕒 1 min read
मुंबई: राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती ( Sambhaji Raje Chhatrapati ) यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर भाजपने शिवसेनेला टार्गेट करत टीका करण्यास सुरुवात केली होती. बहुप्रतीक्षित झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपने 3 तर महाविकास आघाडीने 3 जागा जिंकल्या. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना रोखठोक मधून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज्यसभा निवडणुकांचे निकाल लागले, पण भाजपचा विजयोत्सव आणखी काही दिवस सुरू राहील. शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी न दिल्याचे फळ त्यांना मिळाले, असे भाजप व श्री. फडणवीस यांच्यातर्फे सांगितले गेले. मग धनंजय महाडिकांच्या जागी भाजपने संभाजीराजे यांना अपक्ष उमेदवार बनवून राज्यसभेसाठी का विजयी केले नाही? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
तसेच सर्वच गोष्टीचे राजकारण व राजकारणाचा व्यापार करायचा हे त्यांचे धोरण, विधान परिषदेची निवडणुकही त्यांनी तागडीवरच ठेवली आहे. केंद्रीय यंत्रणांची लाठी-काठी हातातून दूर केली तर भाजपकडे काय उरते? असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IND vs SA : आज रंगणार दुसरी टी-२० मॅच..! पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज
- “पैगंबरांचा अपमान करणाऱ्या नूपुर शर्माना फडणवीस फोन करून…”, संजय राऊतांचा टोला
- राज्यसभा आणि विधान परिषदा मिळून किती कोटींचा धूर निघाला?; सामना ‘रोखठोक’ मधून संजय राऊतांचा सवाल
- बेजबाबदार विधाने करून नुपूर व्हायचे आहे का?; नीलम गोऱ्हेंचा अमृता फडणवीसांना टोला
- “आमचं नशीब चांगलं म्हणून ते…”, छगन भुजबळ यांचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
