Share

“एकनाथ खडसे मतांसाठी हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला” ; गणितं बदलणार?

Published On: 

🕒 1 min read

वसई : राष्ट्रवादीचे नेते व आता राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे उमेदवार असलेले एकनाथ खडसे हे बहुजन विकास आघाडीचे नेते व आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला पोहोचले. भाजप नेते गिरीश महाजन आणि भाजपचे विधान परिषदेतेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही काल आमदार हितेंद्र ठाकूरांची भेट घेतली. त्यानंतर आज एकनाथ खडसेंनी विरार येथे हितेंद्र ठाकूरांची भेट घेतली आहे. आता विधानपरिषदेत हितेंद्र ठाकूर हे कोणाला मतदान करतात हे पाहणं महत्त्वाचे आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या हाय होल्टेज ड्रामा झाल्यानंतर आता राज्यात विधान परिषद निवडणुकांचे रणधुमाळी सुरू आहे. उद्या म्हणजेच २० जूनला राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदानाला आता अवघा एक दिवस राहिला आहे. महाविकास आघाडी आणि भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. यामुळे १० व्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. यामध्ये बहुजन विकास आघाडीची मतं निर्णायक ठरणार आहेत. त्यासाठी आज एकनाथ खडसे यांनी हितेंद्र ठाकूरांची भेट घेतली.

राज्यसभेनंतर आता विधान परिषद निवडणुकीतही लहान पक्ष आणि अपक्ष मोठी भूमिका बजावणार आहेत. विधानसभेत बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. या तिघांची मतं मिळावीत यासाठी महाविकास आघाडी आणि भाजप दोघांचेही प्रयत्न सुरु आहेत.

हितेंद्र ठाकूर आमदार आहेत. त्यांचा मुलगा क्षितिज ठाकूरदेखील आमदार आहेत. मात्र ते सध्या अमेरिकेत असल्याची माहिती आहे. त्यांनी लवकरात लवकर भारतात येऊन आपल्या बाजूनं मतदान करावं, यासाठी भाजप आणि मविआचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी देखील ठाकूर यांची भेट घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!