Share

IND vs ENG : टीम इंडियासमोर मोठं टेन्शन..! पहिल्या कसोटीपूर्वी विराट कोहली कोरोना पॉझिटिव्ह?

Published On: 

मुंबई : १ जुलैपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या बर्मिंगहॅम कसोटीसाठी (IND vs ENG) टीम इंडियाच्या तयारीला मोठा झटका बसला आहे, कारण भारतीय संघातील अनेक खेळाडू कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडले आहेत. ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विन कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होऊ शकला नाही. आता लंडनला पोहोचल्यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीलाही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने एका सूत्राचा हवाला देत म्हटले आहे, की मालदीवमध्ये सुट्टी घालवून परतल्यानंतर विराट कोहलीलाही कोरोनाची लागण झाली होती. पण आता तो बरा झाला आहे. लीसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्यावर विराट खेळणार का, हा मोठा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत बोर्डाने टीम मॅनेजमेंटला सल्ला दिला आहे, की कोरोनामधून बरे होणाऱ्या खेळाडूंवर जास्त दबाव आणू नका. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मालदीवमधून परतल्यानंतर कोहली हॉस्पिटलमध्ये जाताना दिसला.

आता प्रश्न असा, की मालदीवमधून परतल्यानंतर कोहली कोरोना पॉझिटिव्ह आढळला, तर तो खेळाडूंसोबत इंग्लंडला कसा गेला? अश्विनने कोरोनाची लागण झाल्यानंतर सहकारी खेळाडूंसोबत इंग्लंडला जाण्यास नकार दिला होता. बीसीसीआयनेही विराट कोहलीला कोरोनाची लागण झाल्याची कोणतीही माहिती दिलेली नाही.

विराट कोहली आता कोरोनामधून बरा झाला आहे. यापूर्वी सोशल मीडियावर त्याचे काही फोटो समोर आले होते, ज्यामध्ये तो मास्कशिवाय लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसत होता. यादरम्यान अनेक चाहत्यांनी त्याच्यासोबत सेल्फीही काढले. यादरम्यान कॅप्टन रोहित शर्माही त्याच्यासोबत शॉपिंग करताना दिसला. अशा परिस्थितीत कोहलीचे हे बेजबाबदार वर्तन बाकीच्या खेळाडूंसाठी अडचणीचे ठरू शकते.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!