मुंबई : विधानपरिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली आहे. मंगळवारी सकाळी अशी माहिती मिळाली की, उद्धव ठाकरे सरकारच्या १३ बंडखोर आमदारांनी गुजरातमधील सुरतमध्ये तळ ठोकला असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे देखील आहेत. याची माहिती मिळताच महाराष्ट्र सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. या सर्व घडामोडीवर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दग्दर्शक हेमंत ढोमेनंही बंडाबाबत ट्विट केले आहे. ‘आम्ही बंड केलं की आई कालथ्याने चटका द्यायची’ असे हेमंतने ट्विट केले आहे. सध्या या ट्विट च्या सगळीकडे चर्चा चालू आहेत.
‘आम्ही बंड केलं की आई कालथ्याने चटका द्यायची. पण ती तेव्हा प्रायवेट विमानाने डायरेक्ट गुवाहाटीला घेऊन गेली असती तर आज आमची आयुष्यं वेगळी असती, काय म्हणता,’ असं ट्विट हेमंतने केलं आहे. याचबरोबर त्याने #बंड असा हॅशटॅग देखील वापरला.
आम्ही बंड केलं की आई कालथ्याने चटका द्यायची!
पण ती तेव्हा प्रायवेट विमानाने डायरेक्ट गुवाहाटी ला घेऊन गेली असती तर आज आमची आयुष्यं वेगळी असती…
काय म्हणता? #बंड— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) June 21, 2022
हेमंतच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘लहानपणीचं बंड निस्वार्थी, निरागस असायचं. आताच्या राजकारण्यांसारखं कपटी नसायचं, असं एकाने म्हटल आहे. तर ‘आता बंडाच्यासोबत ‘बाप’ असल्यामुळे आई हतबल आ असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. ‘सर्व नियोजित असतं. आपल्याला समजायला थोडा वेळ लागतो’, असं देखील नेटकऱ्यानी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :


