Share

पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू झहीर अब्बास ICU मध्ये दाखल; लंडनमध्ये बिघडली तब्येत!

Published On: 

मुंबई : पाकिस्तानचे दिग्गज माजी कर्णधार झहीर अब्बास यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना लंडनमधील खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. झहीर अब्बास तीन दिवस ऑक्सिजन सपोर्टवर होते आणि तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुबई ते लंडनच्या फ्लाइट दरम्यान झहीर यांची तब्येत बिघडली. लंडनला जाण्यासाठी फ्लाइट पकडत असताना ते एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. लंडनला पोहोचल्यावर त्यांनी किडनीचा त्रास आणि न्यूमोनियाची तक्रार केली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

झहीर अब्बास सध्या डायलिसिसवर असून डॉक्टरांनी त्यांना लोकांना भेटणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, आयसीयूमध्ये दाखल असलेल्या अब्बास यांच्यासाठी प्रार्थनांची फेरी सुरू आहे. पाकिस्तानचे अनेक खेळाडू त्याच्या प्रकृतीबद्दल चिंतित आहेत आणि ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू हाफीजने ट्वीट केले, “झहीर अब्बास साहेबांना लवकर बरे होण्यासाठी आणि पूर्ण आरोग्यासाठी शुभेच्छा.” आशियाचे ब्रॅडमन या नावाने प्रसिद्ध असलेल्या झहीर यांच्या आरोग्यासाठी अनेकांनी प्रार्थना केली.

झहीर अब्बास यांनी १९६९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये त्यांची गणना होते. त्यांनी ७२ कसोटीत ५०६२ धावा आणि ६२ एकदिवसीय सामन्यात २५७२ धावा केल्या. त्याचबरोबर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याचा विक्रम अतुलनीय आहे. झहीर यांनी ४५९ सामन्यांमध्ये १०८ शतके आणि १५८ अर्धशतकांच्या मदतीने ३४ हजारांहून अधिक धावा केल्या. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, ते १ कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये आयसीसीचे सामनाधिकारी देखील होते. २०२०मध्ये दक्षिण आफ्रिकेचा खेळा़डू अष्टपैलू जॅक कॅलिस आणि लिसा स्थळेकर यांच्यासह त्यांना आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!