नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टरमध्ये होणारा पाचवा कसोटी सामना स्थागिती करण्यात आला आहे. आता या सामन्यातील विजेत्याचा निर्णय हा पुढील वर्षी घेतला जाणार आहे. भारतीय संघ पुढच्या वर्षी 2022 मध्ये तीन टी 20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे आता हे निश्चित करण्यात आले आहे की, या दौऱ्यावर भारतीय संघ अतिरिक्त कसोटी सामना देखील खेळेल, जो सध्याच्या मालिकेचा भाग असेल आणि मालिकेचा निकाल ठरवेल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्याने सांगितले की, सामन्याचे पुनर्निर्धारण केले जाईल, म्हणजे मालिकेचा निर्णय तेव्हाच होईल. बीसीसीआय आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ईसीबी) अधिकाऱ्यांमध्ये जवळपास सहमती झाली आहे की पुढील वर्षी जुलैमध्ये होणाऱ्या दोन्ही संघांमधील तीन टी -२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक बदलून चार टी -२०, तीन एकदिवसीय आणि एक कसोटी सामना केला पाहिजे.
दरम्यान, जर भारताने कसोटी जिंकली तर भारत 3-1 मालिकेचा विजेता मानला जाईल आणि इंग्लंडने ही कसोटी जिंकली तर मालिका 2-2 अशी बरोबरी मानली जाईल. जर कसोटी सामना अनिर्णित राहिला तर भारताला 2-1 ने विजेता घोषित केले जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
- तीन आयपीएल संघांना मोठा धक्का; बड्या खेळाडूंची माघार
- आता कुठल्याही परिस्थितीत निवडणुका घ्याव्याच लागतील; सदावर्ते यांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल
- ‘शिवसेनेतील नेत्यांकडूनच मुख्यमंत्री ठाकरेंची दिशाभूल’, मुनगंटीवार यांची टीका
- खाद्यतेलावरील आयात शुल्कात कपात, हा शेतकऱ्यांना आणखी एक धक्का – तुपकर
- ओबीसी समाजाला धक्का : राज्य सरकारला निवडणुका पुढे ढकलता येणार नाही – सर्वोच्च न्यायालय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

