Share

IND vs ENG : “विराटबाबत प्रश्न उपस्थित करणे चुकीचे”, इंग्लंडच्या कर्णधारानं घेतली कोहलीची बाजू

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विराट कोहलीच्या कामगिरीवर अनेक जणांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे जगातील अनेक दिग्गज त्याच्या पाठीशी उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. इंग्लंडने दुसरा एकदिवसीय सामना जिंकून ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात कोहलीला केवळ १६ धावा करता आल्या. इंग्लंडने दिलेल्या २४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ १४६ धावांत गारद झाला. सामन्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर म्हणाला की, कोहलीच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाहीत. त्याने वर्षानुवर्षे चांगली कामगिरी केली आहे. आता या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामना १७ जुलै रोजी होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियाने अगोदर टी-२० मालिका २-१ अशी जिंकलेली आहे.

विराटबद्दल बोलताना जोस बटलर म्हणाला की, “मला वाटते की आपल्यापैकी अनेकांनी असा विचार केला पाहिजे की तो (कोहली) माणूसच आहे. त्यामुळे तो कमी धावसंख्येवरही बाद होऊ शकतो. विराट जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. त्याने वर्षानुवर्षे चांगली कामगिरी केलेली आहे. खराब टप्प्यातून जाणे हे कधीकधी सर्वच खेळाडूंच्या बाबतीत घडत असते.” याआधी टी-२० मालिकेत आणि पाचव्या कसोटीतही कोहली विशेष खेळ दाखवू शकला नव्हता. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनेही विराट बद्दल बोलताना ही वाईट वेळ निघून जाईल असे म्हटले आहे.

विराटने ७० शतके झळकावली आहेत

यावेळी बोलताना बटलर असेही म्हणाला की, ‘एका विपक्षी कर्णधाराच्या नजरेतून मी जाणतो की, तो किती आक्रमक खेळाडू आहे. त्यामुळे गोलंदाजी करताना गोलंदाज कायम दबावत असतो. कोहलीच्या कामगिरीबद्दल त्याने रचलेले विक्रमच सर्व काही बोलून दाखवतात. विराटच्या कामगिरीवर तुम्ही प्रश्न उपस्थित करू शकत नाहीत. कारण त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतक झळकावले आहेत. मात्र गेल्या तीन वर्षांपासून विराटला एकही शतक झळकावता आलेले नाही.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!