मुंबई : सध्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक दुर्घटना घडल्या आहे तसेच १५० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहे. त्यांना जास्तीत जास्त मदत मिळून देण्यासाठी सत्ताधारी पक्ष केंद्राकडे मागणी करत आहे. त्यासाठी राज्यपालांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत सत्ताधारी आमदार, खासदारांनीच दांडी मारली. यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी कठोर टीका केली आहे.
या बैठकीला भाजप आमदार आशिष शेलार यांनी उपस्थिती लावली. मात्र, काँग्रेसचे भाई जगताप, शिवसेनेचे सुनिल प्रभु आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे या बैठकीला गेलेच नाहीत. या पार्श्वभूमीवर मदत देण्यापेक्षा केवळ राजकारण करणं हाच यांचा मुद्दा आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलीय.
दरम्यान त्यांनी असेही म्हंटले की, केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या हेतूनं ही बैठक बोलावण्यात आली होती. पण या बैठकीला गैरहजर राहायचं आणि दुसरीकडे राज्यपालांवर, केंद्र सरकारवर टीका करायची हा प्रकार पूरग्रस्तांच्या दु:खावर डागण्या देण्यासारखा आहे, अशी खंतही उपाध्ये यांनी व्यक्त केलीय.
महत्त्वाच्या बातम्या
- देशवासियांची माफी मागणाऱ्या तलवारबाज भवानी देवीला पंतप्रधानांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले विधान दुर्दैवी
- आसाम मिझोराम सीमावादातून हिंसाचार, आसामच्या 6 पोलिसांचा मृत्यू
- ‘शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत रिंग रोडची मोजणी करून देणार नाही’
- ‘मुंबई इंडियन्स ते कसोटी संघात स्थान’ अवघ्या पाच महिन्यात बदलली सुर्याचे कारकिर्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

