Share

‘खत दरवाढ करुन शेतकऱ्याला पुरतं पांगळ करणं…हीच का सरकारची पी.एम. किसान योजना?’

Published On: 

पुणे : गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोकं वर काढले आणि त्यातच पेट्रोल, डिझेल सोबतच घरगुती गॅस, डाळी, खाद्यपदार्थांच्या किंमतींचे दरही आस्मानाला भिडले आहेत. यामुळे सामान्य माणूस त्रस्त झाला असून घर चालवायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित होत आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसताना आता खासगी रासायनिक खतांच्या किंमतीमध्येही सरासरी ६०० ते ७०० रूपये एवढी विक्रमी दरवाढ केली गेली आहे.

यामुळे या खतांच्या दरवाढीला आता विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला जबाबदार धरत टीकास्त्र सोडलं आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी, खतांची दरवाढ करून केंद्राने शेतकऱ्यांना पांगळ करण्यापेक्षा आधार द्यावा, असं म्हणत केंद्र सरकार विरोधात संताप व्यक्त केला आहे.

‘खत दरवाढ करुन शेतकऱ्याला पुरतं पांगळ करण्यापेक्षा सरकारने जर संपुर्ण देश संकटात असताना देशाला अन्न पुरवणाऱ्या शेतकऱ्याला आधार दिला, तरच देशाला कायमचा आधार मिळेल..शेतकरीविरोधी काळे कायदे आणले, कोरोना काळात आंदोलन करण्यास भाग पाडले, दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी वाटेत काटे पेरले, आणि आता खत दरवाढ करुन शेतऱ्यांचे जगणे मुश्किल केले. हिच का सरकारची पी.एम. किसान योजना ?’ असा सवाल रविकांत तुपकर यांनी केंद्र सरकारला केला आहे.

https://twitter.com/Ravikanttupkar1/status/1394655233481986050?s=20

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!