Share

म्युकरमायकोसीस वाढतोय ; इंजेक्शनसाठी राज्य सरकारने काढले ग्लोबल टेंडर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात अशी भीषण परिस्थिती असतानाच आता राज्यावर म्युकरमायकोसीस या नव्या आजाराने हात पसरायला सुरुवात केली आहे. म्यूकरमायकोसिस हा आजार अनेक रुग्णांना होत असल्याचे समोर आले आहे. या रुग्णांना एम्फोटेरीसीन बी चे तब्बल चाळीस ते पन्नास इंजेक्शन द्यावे लागत आहेत. एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन हे प्रामुख्याने म्युकरमायकोसीसचा संसर्ग कमी करण्यासाठी वापरलं जातं, पण सध्या पुण्यासह राज्यभरात हे इंजेक्शन कुठेच मिळत नाही, अशी तक्रार केली जात आहे.

त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईंकांची या महागड्या इंजेक्शनसाठी फरफट सुरू झाली. एका पेशंट्साठी दिवसाला किमान पाच ते सात याचे डोस द्यावे लागतात. पण अचानक मागणी वाढल्याने सध्या कुठेच हे इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे चित्र गेल्या अनेक दिवसांपासून दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

‘राज्यात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली आहे. त्यामाध्यमातून साधारणत: जूनच्या पहिल्या आठवडयात या इंजेक्शनच्या ६० हजार व्हायल्स आंतरराष्ट्रीयस्तरावरून थेट महाराष्ट्रात दाखल होतील.’ अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करून दिलेली आहे.

सध्या राज्यात एकुण २ हजार ४४५ म्युकरमायकोसिस रुग्ण आहेत तसेच रुग्णांची नोंद पोर्टलवर करण्यात येणार आहे. यामुळे राज्यात किती रुग्ण आढळत आहेत याबाबत माहिती मिळत राहणार आहे. नोटेफायबल रुग्णांना या आजाराचा रिपोर्ट कळणार आहे. संबंधित रुग्णाच्या मोबाईलवर नोटिफिकेशनद्वारे रिपोर्ट कळवण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!