Share

बनावट नंबर टाकण्याचे प्रमाण वाढले! पुन्हा एकावर गुन्हा दाखल 

Published On: 

औरंंगाबाद : शहरात वाहनांवर बनावट नंबर टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. नाका बंदी दरम्यान पोलीस वाहनांची कसून चौकशी तसेच तपासणी करत असताना असे प्रकार उघडकीस येत आहे. कडक निर्बंध लागू झाल्यापासून बनावट नंबर टाकणाऱ्या आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

बनावट नंबर टाकून फिरणा-या रोहीत पुरुषोत्तम अंबीलवादे (रा. जयभावानीनगर) याच्या विरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिसादेवी रोडकडे जाणा-या रस्त्यावरून दुचाकी घेऊन फिरत असताना त्यास पोलीस शिपाई लखन नागोराव गायकवाड यांनी आडवून गाडीच्या कागदपत्राची तपासणी केली असता त्याच्याकडे बनावट नंबरची दुचाकी काढळून आली. या प्रकरणी गायकवाड याने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, बहुतांश बनावट नंबर टाकणारे हे थकलेला हप्ता न भरता गाडीचा वापर, तसेच वसुली करणाऱ्यांनी गाडी नेऊ नये म्हणून दुसरा नंबर टाकत आहे. तर अनेक आवडतीचा हौशी नंबर न मिळाल्यामुळे गाडीवर बनावट नंबर टाकत असल्याचे समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!