लातूर: कोरोना महामारीच्या पहिल्या लाटे पेक्षा दुसरी लाट सगळ्यांसाठीच मोठे आव्हान ठरत आहे. तसेच कोरोना नंतर बुरशीजण्य आजार म्हणजेच ‘म्युकरमायकोसिस’ चे प्रमाणही वाढत आसल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत असला तरी त्यांनी प्रत्येकाचा जीव वाचविणे याच दृष्टीकोनातून काम करावे, असे आवाहन माजीमंत्री आ. संभाजीराव निलंगेकर यांनी केले. कोरोना हद्दपार करण्यासाठी आपण संपूर्ण ताकदीने आरोग्य यंत्रणेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांना आवश्यक असणारी सर्व मदत देण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी आ. निलंगेकर यांनी कोरोना संसर्गाचा आढावा घेत निलंगा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह शहरातील डॉक्टरांशी संवाद साधला आसता, कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच म्युकरमायकोसिसमुळे रुग्णांना धोका असल्याने डॉक्टरांनी रुग्णांना मानसिक आधार द्यावा. तसेच यावेळी बोलताना आ. निलंगेकर म्हटले की, कोरोना संकटकाळ हा सर्वांसाठीच आव्हानात्मक ठरत आहे. मात्र या संकट काळात सर्वांनी एकत्रीत येऊन एकदिलाने व एकजुटीने काम करणे आवश्यक असल्याचे सांगीतले. उपजिल्हा रुग्णालय हे १०० खाटाचे होते ते आपण आता २०० खाटापर्यंत नेले असून यातील ८५ खाटा ऑक्सिजनयुक्त आहेत. आक्का फाऊंडेशन व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज दोन बायोपाईप मशीनचे लोकार्पण करण्यात आले असून लवकरच आणखीन तीन बायोपाईप उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आ. निलंगेकरांनी दिली.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम कशी होईल यासाठी आपण प्रयत्न करीत असून याकरीता प्रशासनाकडे पाठपुरावा करत आक्का फाऊंडेशनही यासाठी बांधील असल्याची ग्वाही आ. निलंगेकरांनी यावेळी दिली. त्यानंतर शहरात सुश्रृत हॉस्पिटलच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोवीड सेंटरचे उद्घाटन आ. निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. अंहकारी, केशव बोबडे, सुनील जाधव यांनी आ. निलंगेकरांचे स्वागत केले.
महत्वाच्या बातम्या
- मान्सूनपूर्व कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश!
- चक्रीवादळाचे रौद्ररूप : केरळातील अनेक घरे जमीनदोस्त, कोकणात समुद्र खवळला
- ‘म्युकरमायकोसिस’चा लातुरात शिरकाव; ५ रुग्ण आढळले
- लसीकरणाचा एक दिवसाचा थाट, पालिकेकडे केवळ ४ हजारांचा साठा!
- ‘पालकमंत्र्यांनी बारामतीच्या इनामदारीचा पट्टा काढून सोलापूरकरांची सेवा करावी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

