Share

पर्यटन नगरी औरंगाबादेत पर्यटन वाढविण्यासाठी ‘लसीकरण’ वाढवा; पंतप्रधान मोदींच्या सूचना!

Published On: 

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्हा पर्यटनासाठी प्रसिध्द असल्याने याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांमध्ये विश्वास वाढावा यासाठी पर्यटनाशी संबंधित क्षेत्रातील सर्व व्यक्तींचे मोठ्या प्रमाणावार लसीकरण करावे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचविले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी औरंगाबाद जिल्ह्यात विविध उपक्रम राबवुन लवकरच संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण पूर्ण करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद मोदी यांना सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे अशा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधला. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार , इतर राज्याचे मुख्यमंत्री तसेच विविध जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. लसीकरणाविषयी माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले , मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन कवच कुंडल अभियान’ राबवून लसीकरण वाढविले आहे.

‘मन में है विश्वास’ हा कोरोना विरूध्दच्या लढाईत मनोबल वाढविणारा उपक्रम आम्ही राबविला. या कार्यक्रमात विविध धर्मांचे धर्मगुरू उपस्थित होते तसेच आर्मीचा देखील सहभाग होता. हा कार्यक्रम यापुढेही सुरू राहणार असून त्याची व्याप्ती अधिक वाढविण्यात येईल. लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या पहिल्या २५ गावांना विशेष निधी देणार आहोत. शहरी तसेच ग्रामीण भागासाठी ‘मेरा वाॅर्ड सौ प्रतिशत टीकाकरण वाॅर्ड’, ‘संतांची भूमी शंभर टक्के लसीकरण भूमी’ असे वेगवेगळे प्रयोग करून जिल्ह्यात लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचेही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!