Share

‘केंद्राच्या संख्येत वाढ करत लसीकरण वाढवा’, राजेश टोपेंचे निर्देश

Published On: 

जालना: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शहरी व ग्रामीण भागांमध्ये नागरिकांकडून मास्कचा नियमित वापर होईल याची काळजी घ्यावी. याबरोबरच लसीकरण केंद्राच्या संख्येत वाढ करत लसीकरणाचा वेग वाढवण्याचे निर्देश आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले. कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत मंत्री टोपे बोलत होते.

बैठकी दरम्यान राजेश टोपे म्हणाले की, शासनाने ठरवून दिलेल्या निकषात जालना पहिल्या स्तरात येत असल्याने जिल्ह्यात सर्वच बाबतीत शिथिलता देण्यात आली असून नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसत आहेत. दरम्यान, नागरिकांनी मास्कचा वापर करणे हे अत्यंत गरजेचे असून मास्कचा वापर न करणाऱ्यांवर पोलिस विभागाने कारवाई करावी. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणही तेवढेच महत्त्वाचे आहे. यासाठी लसीकरण केंद्राच्या संख्येत वाढ करावी. ग्रामीण भागात लसीकरणाचे महत्त्व पटवून देत जालना जिल्हा हा इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये लसीकरणाच्या बाबतीत मागे राहणार नाही याची दक्षता घेऊन लसीकरणाचा वेग वाढवण्याचे निर्देशही मंत्री टोपे यांनी दिले.

कोरोना सोबतच वाढणार दूसरा आजार म्हणजेच म्यूकरमायकोसिस यावर बोलताना टोपे म्हणाले, या आजारावरील उपचार महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत करण्यात येत आहे. या आजारावरील उपचारासाठी रुग्णांकडून पैसे घेतले जात नाहीत ना, याची खबरदारी घेण्यात यावी. तसेच या रुग्णांना आवश्यक असलेल्या इंजेक्शन्सची कमतरता भासणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही टोपेंनी केल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!