Share

प्लास्टीक पाईप चोरी करणाऱ्या तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ

Published On: 

औरंंगाबाद : हॉटेलच्या कम्पाउंड मध्ये ठेवलेले १ लाख २० हजार रुपये किंमतीचे एचडीपीई प्लास्टीक पाईप चोरल्याप्रकरणी अटकेत असलेल्या गणेश प्रल्हाद डाके (वय २३), प्रदीप सुभाष पाझाडे (वय २२) आणि ज्ञानेश्वर साईनाथ चाळगे (वय ३५) या तिघांच्या पोलिस कोठडीत शुक्रवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.एन. माने यांनी दिले. तर भगवान दगडू वाघ आणि महेश तुळशीराम डाके (सर्व रा. मांजरगाव ता. बदनापुर जि. जालना) अशी पसार असलेल्या आरोपींची नावे आहेत.

प्रकरणात प्रदीप बाबुराव तुपे (वय ४१, रा. उस्मानुपरा) हे केबल कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांनी १ मे दरम्यान लाडगाव येथील भारत पेट्रोलपंपा जवळील हॉटेल रानवाराच्या कम्पाउंडमध्ये एचडीपीई प्लास्टीक पाईपचे आठ बंडल करमाड परिसरात ठेवले होते.

पाईप चोरणा-या तिघांना तेथील वॉचमन आणि हॉटेलच्या एका कर्मचा-याने पकडले तर दोन चोरटे पाईप घेवून पसार झाले. प्रकरणात करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांनी गणेश डाके याने दिलेल्या माहितीवरुन मांजरगाव येथे जमीनीत पुरलेले तीन पाईपचे बंडल पोलिसांनी जप्त केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!