Share

राजकीय गुरू रघुनाथ येमूलच्या पोलीस कोठडीत वाढ ; आणखी दोन ज्योतिष्यही अडचणीत

Published On: 

पुणे : आज सकाळी अंधश्रद्धेला बळी पडून एक उच्चशिक्षित कुटुंबातील पतीने पत्नीचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राजकीय गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रघुनाथ येमुल याच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चतुःशृंगी पोलिसांनी येमुलला अटक केली होती.

पुण्यातील उद्योजक गणेश नानासाहेब गायकवाड यांना पत्नीविषयी अघोरी सल्ला देऊन लग्न मोडण्याच्या कटात सहभागी असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. अनिष्ट रूढी आणि अघोरी कलमान्वये चतु:शृंगी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 27 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. दरम्यान या प्रकरणात आता त्याच्या पोलीस कोठडीत एक दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

तसेच याप्रकरणात चेन्नई येथील आर. सी. बेसल व शहरातील जॉन या ज्योतिषांचीही नावे समोर आली आहेत. या राजकीय गुरुकडे पीडितेच्या पतीने भविष्याबाबत विचारणा केली होती. तसेच, त्यांनी चांगली व वाईट वेळ याबाबत कथन केल्याचे तपासात समोर आल्याची माहिती सहाय्यक सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी न्यायालयाला आहे. संबंधित गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा आहे. येमूल हा तपासास सहकार्य करीत नाही.

त्याने आरोपींच्या संगनमताने संसार मोडण्यासाठी कट केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तिचा पती येमूल याच्या संपर्कात होता. तसेच ते दोघेही तिरूपती बालाजी याठिकाणी सोबत असल्याचे छायाचित्र उपलब्ध आहे. त्यामुळे, पीडितेचा पती कोठे आहे याबाबतची माहिती आरोपीला असून, गुन्ह्याच्या अधिक तपास करण्यासाठी येंमुल याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी अ‍ॅड. मुरळीकर यांनी न्यायालयाला केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!