लातूर: जिल्ह्यात दररोज पाच-सहामोबाईलधारक फसव्या मेसेजला बळी पडत आहेत, फसव्या लिंक, फसवे कॉल, आकर्षक ऑफरच्या नावाखाली दररोज किमान पाच, सहा तक्रारींची नोद होत आहे. मोबाईलवरील फसवे मेसेज, कॉल, ऑफर अथवा लिंकला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन लातूर पोलिसांच्या सायबल सेल विभागाने केले आहे. मोबाईलवरील कोणताही मेसेज, कॉल, लिंक फसवी नाही ना? याची प्रत्येकाने खात्री करून घेण्याची गरज आहे.
दरम्यान,मोबाईलवर वेगवेगळ्या खेळांच्या, रमी ॲप, तिर्रट ॲपच्या माध्यमातून तरूणांना जाळ्यात ओढणे व फसवणूक करण्याचे प्रकार समोर येत आहेत. फसव्या लिंक, कॉल, ओटीपी मेसेजेसद्वारे बँकेतून पैसे गायब होण्याचे प्रकार सुरू असून, याउपर, लग्न जुळविणाऱ्या साईटस्वरून किंवा सोशल मीडियातून मैत्री करून खंडणीच्या घटना देखील वाढल्या आहेत. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या ॲपची लिंक पाठवून ते डाऊनलोड करण्यास सांगून समोरच्या व्यक्तीच्या मोबाईल फोनवर ताबा मिळवून फसवणूक करीत आहेत.
लॉकडाऊनमुळे बरेच नागरिक घरीच असल्याने त्यांना मोबाईलद्वारे त्यांची फसवणूक होत आहे यात तरुणाई अग्रेसर असल्याने तरूणांनी अशा फसव्या मोबाईलवरील मेसेज, लिंक, कॉलला बळी पडू नये. सायबर गुन्हेगारी करणारे लोक परराज्यातील असल्याने त्यांना शोधणे आणि कारवाई करणे फार मोठे जिकरीचे काम असून, अलीकडे तरूण मंडळी या प्रकाराला बळी पडत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अंकिता लोखंडे पुन्हा चर्चेत ; चर्चेचा विषय ठरतोय ‘हा’ व्हिडीओ
- जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? – निलेश राणे
- तापसीवरील ‘त्या’ ट्विटनंतर कंगना पु्न्हा ट्रोल
- फिट असूनही कोरोना होतो कसा ? नेटकऱ्यांच्या प्रश्नावर मिलिंद सोमणने दिले हे उत्तर
- ‘काँग्रेसमध्ये काम करणाऱ्यांची किंमत, निष्क्रिय नेत्यांची गरज नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

