Share

आर्यन खानच्या अडचणीत वाढ; कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

Published On: 

मुंबई : स्पेशल एनसीबी कोर्टाने अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या कोठडीत वाढ केली आहे. ही वाढ ३० ऑक्टोबर पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे आर्थर जेल मधला आर्यनचा मुक्काम वाढल्याचे दिसते आहे.तसेच त्याच्या सोबत अटकेत असणारे इतर ७ जणांनाच्या कोठडीत सुद्धा कोर्टाने वाढ केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आर्यन खान ड्रग पार्टी प्रकरणी तुरुंगात आहे. ७ ऑक्टोबरला आर्यन खान याच्या कोठडीत १४ दिवसाची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज तरी त्याला जामीन मिळेल अशी खान कुटुंबियांना आशा होती परंतु कोर्टाने त्याचा जामिनाचा अर्ज फेटाळून लावला. आर्यनच्या वकिलांनी या निकाला विरोधात उच्च न्यायालात धाव घेतली होती परंतु तिथे सुद्धा आर्यन खानच्या नशिबी निराशा आल्याचे दिसत आहे.

उच्च न्यायालयाने २६ ऑक्टोबरला या विषयावर सुनावणी घेणार असल्याचे सांगितले. दरम्यान आज शाहरुख याने आर्यन खान याची तुरुंगात जाऊन भेट घेतली. ही भेट १५ मिनिटाची होती. यामध्ये त्याने आई गौरी खानशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला.या मध्ये विविध गोष्टीवर चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!