Share

‘अजित पवारांच्या बहिणीच्या कार्यालयावर सलग तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाची कारवाई’

Published On: 

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आणि त्यांच्या नातेवाईकांवर आज सलग तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाने कारवाई केली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील बहिणींवरही छापा टाकला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण अधिकच चिघळले असल्याची चिन्हे आहेत.

दरम्यान यावर राष्ट्रवादी नेत्यांकडून आता संताप व्यक्त करण्यात येत आहे. देशातील आणि राज्यातील राजकारणाची पातळी ज्या पद्धतीने खाली घसरली आहे ते धक्कादायक आहे. सरकारी यंत्रणांचा अयोग्य वापर करत एखाद्याचं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न भाजपला काही नवीन नाही ते त्यांच्या रक्तातच आहे पण या व्यक्तीवरचा राग म्हणून त्याच्या कुटुंबाला, बहिणींना त्रास देण्याची ही कुठली पद्धत, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला आहे.

अजित पवार कधीच हारणार नाहीत. माणूस स्वतःवर आलेल्या कोणत्याही संकटांशी सामना करेल परंतु यामध्ये विनाकारण घरातील महिलांना मधे ओढून यातून राजकारण करत असेल तर दादा ते व्याजासकट याचा हिशोब चुकता करतील, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत. दरम्यान जित पवारांच्या 3 बहिणींमध्ये कोल्हापुरातील विजया पाटील, तर पुण्यातील नीता पाटील आणि रजनी इंदूलकर यांचा समावेश आहे. तर अजित पवार आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. सायंकाळी चार वाजता ते औरंगाबादेत दाखल होतील.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!