औरंगाबाद : वैद्यकीय अधीक्षक कार्यालयासमोर गेल्या ८५ दिवसांपासून उपोषणास बसलेल्या कामगारांचे थकित बोनस देऊन, आरोग्य सेवेतील नव्याने होणाऱ्या पदभरतीत कंञाटी पध्दतीने रुग्णसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावुन घ्यावे. या मागणीसाठी आयटकचे अॅड. अभय टाकसाळ यांनी शुक्रवारी (दि.५) मुख्यमंत्र्यांकडे धाव घेत निवेदन दिले.
सफाई कामगार हे अत्यंत जबाबदारीने सफाईचे काम करतात. रुग्ण शिफ्टिंगसह रुग्णसेवेचे अनेक कामे त्यांच्या कडून करुन घेतली जातात. कोव्हीड-१९ साथीच्या काळात जीवावर उदार होऊन या कामगारांनी रुग्णसेवा दिली आहे. कोरोना काळात प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या जीवाची काळजी करत असताना या कर्मचाऱ्यांनी रुफ्नासेवेला प्राधान्यावर ठेवले. पीपीई कीट नसतांना जीवाची पर्वा न करता त्यांनी काम केले.
गेल्या ८५ दिवसांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अधिक्षक कार्यालयासमोर त्यांचे बोनस करिता उपोषण सुरू आहे. तो बोनस तात्काळ मिळावा, आरोग्य खाते तसेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन खात्यातील नवीन पदभरतीस मान्यता दिलेली आहे, त्या पदभरतीत सामावुन घेऊन या कोव्हिड योद्ध्यांचा सन्मान करावा. अशा मागण्या यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटकचे महासचिव अॅड. अभय टाकसाळ, विकास गायकवाड, गजानन खंदारे, किरण राज पंडित या शिष्टमंडळाची उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या
- अंदाज वर्तवण्याखेरीज फडणवीसांच्या हाती आता काहीही राहिलेले नाही; सुभाष देसाईंचा टोला
- ‘पिकेल ते विकेल’अंतर्गत आव्हाना येथे रयत बाजार
- 2009 च्या निवडणुकीत ‘ध’ चा ‘प’ कसा झाला हे मला आजपर्यंत कळालेले नाही- धनंजय मुंडे
- अपात्र लाभार्थींना नोटीस; धनदांडगे शेतकरी ठरले अपात्र
- अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ; सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

