Share

समृद्धी महामार्गाच्या कामावरील घटना! दगड अंगावर पडून अल्पवयीन कामगाराचा मृत्यू

Published On: 

औरंंगाबाद : डोंगर कोरून सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामावर दगड अंगावर पडून अल्पवयीन कामगाराचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि.३) सकाळी नऊच्या सुमारास जटवाडा परिवारात घडला. शेख मुस्तकीन ऊर्फ राजू शेख कय्युम (वय १७, रा.जटवाडा) असे मृताचे नाव आहे. विशेष म्हणजे शेख मयत मुस्तकिम यांच्या आधारकार्डवरील जन्म तारखेनुसार त्याचे वय १७ वर्ष आहे. मात्र, कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार तो २० वर्षाचा आहे त्यामुळे वयावरून साशंकता निर्माण झाली आहे.

राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग ओळखला जातो आहे. सध्या या मार्गाने काम वेगाने सुरू आहे. औरंगाबादलगत असलेल्या हर्सूल-सावंगी येथून हा मार्ग जाणार आहे. दोन डोंगराच्या मधून समृद्धी महामार्ग जाणार आहे.

याच कामावर मुस्तकिम हा मजुरीचे काम करत होता. गुरुवारी सकाळी काम करत असताना अचानक मोठा दगड मुस्तकिमच्या अंगावर पडला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ घाटीत नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या घटनेची नोंद दौलताबाद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!