औरंगाबाद : लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू असताना बजाजनगर येथील जलवाहिणीच्या कामाचे उद्घाटन करणारे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय सिरसाठ यांच्यासह शिवसेनेच्या ३० कार्यकर्त्यांवर वाळुज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
कोरानाला रोखण्यासाठी शहरासह जिल्हाभरात संचारबंदीसह जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले होते. परंतू शिवसेनेचे लोकप्रतिनिधींनी आदेश पायदळी तुडवत हे उद्घाटन रविवारी केले. जयभवानी सोसायटीमध्ये आमदार शिरसाठ यांच्या हस्ते जलवाहिणीचे उद्घाटन रविवारी दुपारी १२. ३० वाजता करण्यात आले. या वेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले नव्हते.
या वेळी संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करत सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमवून भूमिपूजन करणारे आमदार संजय शिरसाट तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी ‘डावात माचळा पार्टीकडून पोलीस आयुक्ताकडे निवेदनाद्वारे केली होती. दरम्यान, याप्रकरणी पो. कॉ.विनोद नितनवरे यांच्या फिर्यादीवरून रविवारी रात्री आमदार संजय शिरसाट यांच्यासह ३५ ते ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन पागोटे हे करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या चव्हाणांची शिवसेना मतदारसंघातील वैजापूर कोविड सेंटरला भेट, सुविधांच्या अभावावरुन नाराजी!
- मोठी बातमी : उद्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक, राज्यातलं लॉकडाऊन पुन्हा वाढणार ?
- पप्पू आणि पप्पूगिरीच्या पेटंटचे सर्व हक्क काँग्रेसकडे राखीव आहेत; भाजपने काँग्रेसला डिवचलं
- राज्याच्या नाकर्तेपणाच्या धोरणामुळे रोज सरासरी २ लाख लसीकरण
- रहिवासी आणि खाजगी डॉक्टरांच्या वादात रुग्णांचा अडकला श्वास!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

