औरंगाबाद : शेतकऱ्यांना ‘साले’ म्हणत त्यांचा अपमान करणे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना चांगलेच महागात पडले होते. त्यामुळे त्यांना राज्यात ‘दाजी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. तर हे ‘दाजी’ काही-ना-काही कारणाने कायमच चर्चेत असतात. सध्या औरंगाबाद शहरात दानवे यांच्या बाबत वेगळीच चर्चा ऐकायला मिळतेय. रावसाहेब भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले त्या वेळी वेगवेगळ्या पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यात औरंगाबादच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता. विशेष म्हणजे जुन्या कार्यकर्त्यांना डावलत नव्याने पक्षात दाखल झालेल्यांना पदे देण्यात आली होती, त्यामुळे जुने कार्यकर्ते नाराज झाले होते.
आता या पक्षात आयात झालेले दोन पदाधिकारी वेगवेगळ्या घटनेत जखमी झाले आहेत. वास्तविक त्यातील एकाला डिसेंबर अखेरीस सिडको परिसरात मारहाण झाली होती. तर काल हॉटेल ताज समोर एका पदाधिकाऱ्याला भांडणात दगड लागल्याने तो जखमी झाला. या दोन्ही घटनांचा तसा एकमेकांशी संबंध नसला तरी या प्रकरणावरून शहरात खुसखुशीत चर्चा रंगत आहेत.
हे दोन्ही कार्यकर्ते दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. पक्षात अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून दोघांनाही पदे देण्यात आली आहेत. अशात या दोन्ही घटना त्यांच्याच बाबतीच घडल्याने ही चर्चा होणेही स्वाभाविकच आहे. या सर्व घटनांचा एकमेकांशी संबंध असो किंवा नसो, कट्यावर चर्चा मात्र, चांगल्याच रंगल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- खाकीतील सौंदर्यवती! उपनिरीक्षक पल्लवी जाधवच्या डोक्यावर मिस इंडियाचा ताज
- महत्त्वाचे! पूजा चव्हाण प्रकरणी पहिला खासगी खटला दाखल
- आश्चर्यम! बीड जिल्ह्यात भाजपच्या मदतीला धावली शिवसेना
- धनंजय मुंडेकडून बीडची पालिका ‘टार्गेट’, नगराध्यक्षांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
- ‘बदनामी करू नका, अन्यथा आम्हालाही जीव द्यावा लागेल’, पूजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

