Share

‘अडीच वर्षात मुख्यमंत्री मंत्रालयात पोहचू शकले नाहीत, ते शेतकऱ्याच्या बांधावर काय जाणार?’

Published On: 

देगलूर : गेल्या दोन ते अडीच वर्षापासून राज्याचा काय विकास झाला, त्या प्रमाणात केंद्राने काय विकास केला हे तुम्ही मतदार म्हणून कधी तपासणार आहात? मुख्यमंत्री ना मंत्रालयात वेळेवर येतात, ना वर्षावर वेळेवर पोहोचतात. तर ते शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांधावर कधी पोहोचणार? असा सवाल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.

या निवडणुकीनंतर राज्यातील सत्तेत बदल होणार आहे की नाही? हे मला माहीत नसले, तरी या निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणाची दिशा बदलेल, असा दावाही त्यांनी केला. भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

गेल्या अनेक वर्षापासून नांदेडची केंद्रात आणि राज्यात सत्ता होती तरीही तुम्ही नांदेड-देगलूर-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न सोडू शकणार नाहीत. खरे तर , हे मतदारांचे दुर्दैव म्हणावे लागेल. रेल्वे मार्ग संबंधात केंद्र व राज्याने अर्धा अर्धा वाटा उचलायला पाहिजे. कर्नाटक सरकारने तो वाटा उचललेला आहे. पण अद्याप महाराष्ट्र सरकारने नांदेड-बिदर रेल्वेमार्ग संदर्भातील आपला वाटा उचललेला नाही. परंतु मी तुम्हाला आश्वासन देतो, की या निवडणुकीनंतर हे काम मार्गी लावून त्याच्या उद्‍घाटनाला मी स्वतः येईन, असा शब्द दानवे यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!