Share

नागरिकांच्या स्वप्नातील रस्त्यांचे डिझाइन प्रत्यक्षात उतरणार

Published On: 

औरंगाबाद : स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) कंपनीने शहरातील रस्त्यांचा कायापालट करण्यासाठी डिझाइन स्पर्धा राबवली आहे. स्ट्रिटस् फॉर पीपलअंतर्गत प्रमुख चार रस्त्यांचा विकास करण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी १७ डिसेंबर २०२० पर्यंत चेन्नई, पुणे यासह विविध शहरांतील शंभरपेक्षा अधिक तज्ज्ञांनी सहभाग नोंदवला. तज्ज्ञांकडून आलेल्या रस्त्यांच्या डिझाइनचे व्हॅल्युएशनही आता पूर्ण झाले आहे. लवकरच या स्पर्धेच्या निकाल घोषित केला जाणार आहे.

केंद्रीय शहरी विकास खात्यांतर्गत दि इंडिया स्मार्ट सिटी मिशन यांनी राष्ट्रीय स्तरावर स्ट्रिटस् फॉर पीपल या योजनेत औरंगाबाद महापालिकेने सहभाग घेतला आहे. याअंतर्गत पैठण गेट ते गुलमंडी (मॅचवेल), क्रांतीचौक ते गोपाळ टी चौक, सिडकोतील कॅनॉट परिसर आणि एमजीएम रोड डी साइट या रस्त्यांचा विकास केला जाणार आहे.

नागरिकांच्या स्वप्नातील रस्ते साकारण्यासाठी या चार रस्त्यांसाठी एएससीडीसीएलने डिझाइन स्पर्धा राबवली. एएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी केलेल्या आवाहनानुसार विद्यार्थी, आर्किटेक्ट, अभियंते आणि इच्छुकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

चेन्नई, पुणे यासह देशभरातील विविध शहरांतून १०० पेक्षा अधिक ऑर्किटेक्ट, अभियंते, विद्यार्थी यांनी ७ जानेवारीपर्यंत रस्त्यांचे त्यांच्या संकल्पनेतील डिझाइन सादर केले आहे. १० जानेवारीनंतर स्पर्धकांनी सादर केलेल्या डिझाइनचे व्हॅल्युएशन करण्यात आले. आता हे कामही पूर्ण झाले असून लवकरच निकाल घोषित केला जाणार आहे. स्पर्धेसाठी प्रत्येक साइटसाठी आकर्षक रोख बक्षिसे जाहीर केली आहेत, त्यानुसार संबंधितांचा गौरवही केला जाईल, अशी माहिती एएससीडीसीएलचे उपमुख कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम यांनी दिली.

उत्कृष्ट डिझाइन रस्त्यांवर साकारली जाणार
पालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले की, चारही रस्त्यांसाठी नाविन्यपूर्ण डिझाइन मिळाल्या असतील, असा विश्वास आहे. लवकरच या डिझाइनद्वारे शहरात रस्त्यांवर उल्लेखनीय बदल घडलेला दिसेल. निकाल घोषित झाल्यानंतर उत्तम डिझाइननुसार चारही रस्ते विकसित केले जातील. प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा मोहन नायर यांनी सांगितले की, प्रत्येक साइटवर अंमलबजावणी करताना विजयी स्पर्धक एएससीडीसीएलला मदत करतील.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!