औरंगाबाद : मराठा समाजासाठी आजपर्यंत अनेक प्रयत्न केले आहेत. समाजासाठी काम करताना पक्ष कोणताही असो समाजाची बाजू मांडतांना मागे-पुढे पाहणार नाही, असे स्पष्ट मत आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केले. साष्टपिंपळगाव इथं सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली, त्या वेळी ते बोलत होते.
हे आंदोलन सुरू राहणे महत्त्वाचे आहे. मात्र, अन्नत्याग करू नका अशी विनंती देखील आमदार धस यांनी केली. कोणीतरी ओबीसीचा नेता होण्यासाठी काहीतरी बोलतो, ते चुकीचे आहे. आम्हाला ओबीसीचे आरक्षण नको मात्र, आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळायला हवे असेही धस म्हणाले. सध्याच्या सरकारला समाजा-समाजामध्ये भांडण लावयचे असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव इथं २० जानेवारीपासून आंदोलन सुरू आहे. राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले असले तरी आंदोलन सुरूच आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्णय इथल्या ग्रामस्थांनी घेतलाय.
महत्वाच्या बातम्या
- खेळाडूंमधील शिस्त ही यशाची गुरूकिल्ली – मुकुंद कुलकर्णी
- नागरिकांच्या स्वप्नातील रस्त्यांचे डिझाइन प्रत्यक्षात उतरणार
- शिवाजी महाराज मूळचे कर्नाटकातील; कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ यांनी तोडले अकलेचे तारे
- यंदाच्या आयपीएलचे सर्व सामने ‘महाराष्ट्रातचं’ होणार ?
- मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत जोर बैठकांना सुरुवात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

