Share

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांग्लादेशचा झिंबाब्वेवर ३ गडी राखुन विजय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : झिंबाब्वे दौऱ्यावर असलेल्या बांग्लादेशने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला आहे. झिंबाब्वेने दिलेल्या २४१ धावांचे लक्ष्य बांग्लादेशने अखेरच्या षटकात पार करत विजय संपादन केला. यासह तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

नाणेफेक जिंकत झिंबाब्वेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारीत ५० षटकात झिंबाब्वेने ९ गडी गमावत २४० धावांची मजल मारली. वेस्ले मधेव्हरेने झिंबाब्वेकडून ६३ चेंडुत ५ चौकार आणि १ षटकारांसह सर्वाधीक ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली. बांग्लादेशकडून या डावात शॉरिफुल इस्लामने सर्वाधीक ४ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात बांग्लादेशने ३ गडी आणि चार चेंडु राखत हे अव्हान पार केले. बांग्लादेशकडून शकिब अल हसनने १०९ चेंडुत ८ चौकारासंह ९६ धावांची नाबाद खेळी केली. ल्यूक जोंगवेने झिंबाब्वेकडून सर्वाधीक २ गडी बाद केले. यासह बांग्लादेशने हा सामना ३ गडी राखुन जिंकला. नाबाद अर्धशतकासाठी शकिब अल हसनला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!