मुंबई: ‘‘आमच्या प्रेषितांचा अपमान करणाऱ्यांना उडविण्यासाठी आमच्या शरीरावर स्फोटके बांधू. या चुकीसाठी कोणतीही माफी, कोणतीही सुरक्षा व्यवस्था त्यांना वाचवू शकणार नाही,’’ अशी धमकी ‘अल कायदा’ने दिली आहे. यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
“निवडणुका जिंकणे याशिवाय त्यांना दुसरे काहीच सुचत नाही. उद्या ‘अल कायदा’ने त्यांची धमकी दुर्दैवाने खरी करून दाखवलीच तर तेथेही राजकारण करतील व त्या बॉम्बस्फोटांना हिंदू-मुसलमान असा रंग देऊन निवडणुकांत मते मागतील. राजकारण हे असे खालच्या पातळीवर गेले आहे. भाजपाचे हिंदुत्व हे इतरांच्या धर्मद्वेषावर आधारित आहे. भाजपाचे हिंदुत्व फाळणीस निमंत्रण देणारे व धार्मिक तणावातून राजकीय स्वार्थ साधणारे आहे.”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
भाजपाचे हिंदुत्व लोकांना अंधभक्त बनवून दुसऱ्या धर्माचा द्वेष करायला लावणारे आहे. या विषाच्या घोटाने देश तडफडला तरी त्यांना पर्वा नाही. मोहम्मद पैगंबरांच्या अपमान प्रकरणात भाजपाला हवा असलेला धार्मिक द्वेष व उन्माद दोन्ही निर्माण झाले. त्या उन्मादाचा उत्सव करायला अंधभक्त आहेतच, पण ‘अल कायदा’ची धमकी देशावर उलटली तर हे अंधभक्त बिळातच लपतील. हिंदूंचे मात्र नाहक बळी जातील. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यांमुळे देशावर अपमानित होण्याची वेळ आली. हा प्रश्न हिंदू-मुसलमानांचा नाही, तर हिंदूंच्या सहिष्णुतेचा आहे. निदान याप्रश्नी सरसंघचालक मोहन भागवत यांनी तरी परखड भूमिका घ्यायला हवी, पण एरवी बोल बोल बोलणारेही येथे गप्प बसले आहेत. असा टोला राऊत यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या:
- “…धमकीनंतर मोदी सरकारने खबरदारीची योजना म्हणून काय करावे?”, संजय राऊतांचा टोला
- भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यांमुळे देशावर अपमानित होण्याची वेळ- संजय राऊत
- “उद्या मुंबई-महाराष्ट्रात ‘अल कायदा’ने काही विध्वंसक कृत्य केले तर…”, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
- “ज्या पक्षाने माझ्यासारख्या अतिसामान्य…”, अमोल मिटकरी यांचे मोठे वक्तव्य
- IND vs SA 2022 : दक्षिण आफ्रिकेसमोर भारताच्या गोलंदाजांनी पत्करली शरणागती, ७ गडी राखून पराभव


