Share

पूजा चव्हाणप्रकरणी आक्रमक चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Published On: 

मुंबई: बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पूजा चव्हाण या तरुणीचा पुण्यात मृत्यू झाला आहे. या गूढ मृत्यू प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. ठाकरे सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विरोधकांचा स्पष्ट रोख आहे. संजय राठोड व पूजा चव्हाण या तरुणीचे संबंध असल्याचे काही फोटो व व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. सोशल मिडीयावर देखील संजय राठोड यांनीच पूजा चव्हाणला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा सूर उमटतोय.

यामुळेच संजय राठोड यांचा पूजा चव्हाणच्या मृत्यूशी संबंध असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यात भाजप नेत्या चित्रा वाघ आघाडीवर आहेत. संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. पूजाच्या गूढ मृत्यू प्रकरणाचा पाठपुरावा चित्रा वाघ करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना धमक्यांचे फोन आले होते.

दरम्यान, लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने 12 फेब्रुवारी रोजी किशोर वाघ यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा चव्हाण प्रकरणात चित्र वाघ या आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी वन मंत्री संजय राठोड यांच्या चौकशीची मागणी लावून धरलेली आहे. त्याचवेळी चित्रा वाघ यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने तर्कवितर्क लढवले जात आहे.

परळच्या महात्मा गांधी रुग्णालयात मेडिकल रेकॉर्डर म्हणून कार्यरत असताना चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांनी 1997 मध्ये तक्रारदार व्यक्तीच्या भावाचा स्पाइनल कॉर्डच्या शस्त्रक्रिये दरम्यान गांधी रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर तक्रारदाराने भावाच्या मुलाला नोकरी मिळावी म्हणून अर्ज करण्याचा सल्ला देणाऱ्या वाघ यांनी तक्रारदाराला चार लाखांची लाचही मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

त्यानंतर 5 जुलै 2016 रोजी एसीबीने किशोर वाघ यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना 12 जुलैपर्यंत पोलीस कोठडीही सुनावण्यात आली होती. त्यानंतर एसीबीकडून 1 डिसेंबर 2006 ते जुलै 2016 दरम्यान वाघ यांच्याकडे असलेल्या उत्पन्नाचा तपास करण्यात आला होता. या तपासात त्यांच्याकडे एक कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडली होती. त्यांच्या उत्पन्ना पेक्षा 90 टक्के अधिक ही रक्कम होती. त्यानंतर एसीबीने 12 फेब्रुवारी रोजी किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!