🕒 1 min read
मुंबई : काही दिवसापुर्वी भारताचा माजी क्रिकेटपटु युवराज सिंगने त्याच्या कसोटी क्रिकेटबद्दल बोलताना खंत व्यक्त केली होती. त्यावेळी युवराज म्हणाला होता की पुढील जन्मात सात वर्षे मला भारतीय कसोटी संघात १२वा खेळाडू बनुन रहायला नाही आवडणार. असे बोलत त्याने बीसीसीआयच्या निवड समितीवर निशाणा साधला होता.
युवराजच्या या वक्तव्यावर त्याचा एकेकाळचा संघातील सहकारी भारताचा माजी क्रिकेटपटु मोहम्मद कैफने प्रतिक्रिया दिली आहे. युवराजच्या ट्विटला रिप्लाय करताना कैफने लिहीले आहे की,’ऑस्ट्रेलिया विरुद्ध २००१ मध्ये केलेल्या पहिल्या खेळी पासुन ते २०११ चा विश्वचषक यादरम्यान तु या जन्मातच अनेक अनमोल आठवणी दिल्या आहेत … मग तुला दुसऱ्या जन्माची गरजच का आहे भावा’ असे ट्विट केले आहे. या ट्विटने अनेक कैफने चाहत्यांचे मन जिंकले आहे.
From your first knock in 2000 vs Australia till the 2011 World Cup you created plenty of golden memories in this life itself…why bother about agla Jeevan, Bhai 🙂
— Mohammad Kaif (@MohammadKaif) May 24, 2021
युवराज सिंगची मर्यादीत षटकातील कामगीरी ही खुप चांगली झाली होती. युवराजने त्याच्या कारकिर्दीत भारतीय संघाला २००७चा टी-२० आणि २०११ चा विश्वचषक जिंकुण देण्यात मदत केली होती. मात्र युवराजला कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळाली नव्हती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये युवराजने ३०४ सामन्यात ८७०१ धावा आणि १११ गडी बाद केले आहे. तर टी-२० मध्ये ५८ सामन्यात ११७७ धावा आणि २८ गडी बाद केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- चंद्रकांत पाटलांचे ‘ते’ विधान मराठा आरक्षण संघर्षातील शहिदांचा अपमान करणारे – कॉंग्रेस
- दिलासा! म्यूकरमायकोसिसवरील उपचार सरकारी योजनेतूनच होणार
- आकडेवारी जाहीर ; देशात आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ लोकांचे झाले लसीकरण
- ‘मोदींच भावनिक होणे आणि डोळ्यातले अश्रू म्हणजे ठरवून केलेला कार्यक्रम’
- राजगडाच्या मातीतून ऐतिहासिक वस्तूंचा उलगडा; सह्याद्री प्रतिष्ठानला सापडल्या अनमोल गोष्टी !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

